Positive Stories

१९ - मे - २०२२

मूलभूत प्रशिक्षणामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या

पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव (लातूर) येथे मूलभूत प्रशिक्षणामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल पोलीस अंमलदार अंकुश गजानन जायभाये यांचा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

१७ - जून - २०२२

सोयाबीन चोरट्यांना 34 लाखांच्या मुद्देमालासह इंदोर मध्यप्रदेश येथून अटक

सोयाबीन चोरट्यांना 34 लाखांच्या मुद्देमालासह इंदोर मध्यप्रदेश येथून अटक केल्याने कन्हेरगाव येथील श्री.गोपाल बंग यांनी पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.)यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन पोलीस दलाचे आभार मानले.

१६ - मे - २०२२

गंभीर गुन्ह्यांचा उत्कृष्टरित्या तपास व उकल, पो. अधि./ अंमल. चा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

गंभीर गुन्ह्यांचा उत्कृष्टरित्या तपास व उकल करत गुन्हेगारीस प्रतिबंध करणाऱ्या तसेच दोषसिद्धीसाठी विशेष मेहनत घेणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदारांचा सत्कार पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.

१६ - मे - २०२२

दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेत, चोरीच्या 02 दुचाकी जप्त.

दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या आरोपीस पोलीस स्टेशन मानोरा येथील पथकाने शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीच्या 02 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

१५ - मे - २०२२

Solving Sensational Crimes

पोलीस स्टेशन मंगरूळपीर हद्दीतील ग्राम शेलूबाजार येथील सासूसह मेव्हणीची दुहेरी हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी शिताफीने तात्काळ अटक केली.

१३ - मे - २०२२

34 लाखांच्या मुद्देमालासह 02 चोरट्यांना इंदोर, मध्यप्रदेश येथून अटक

34 लाखांच्या मुद्देमालासह 02 चोरट्यांना इंदोर, मध्यप्रदेश येथून अटक; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.

१२ - मे - २०२२

Helping distressed person

कारमधील 3.76 लाख रुपयांची चोरी झालेली बॅग सापडली.

०९ - मे - २०२२

Solving Sensational Crimes

पोलीस स्टेशन वाशीम ग्रामीण हद्दीतील ग्राम केकतउमरा येथील हत्येचा पोलिसांनी केला 24 तासांचे आत उलगडा, बापाची हत्या करणाऱ्या आरोपी मुलास केले जेरबंद.

०७ - मे - २०२२

Recovery of stolen property

दुकानातून घरी जात असलेल्या व्यापाऱ्याला मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम जबरीने लुटणाऱ्या आरोपींचा घेतला अवघ्या 36 तासांत स्था.गु.शा.च्या पथकाने शोध. 4 आरोपींसह 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त.

०३ - मे - २०२२

Handling Communal/ Caste Tensi

आगामी 'रमजान ईद'च्या पार्श्वभूमीवर SP श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा शहरात 'रूट मार्च'चे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये एकूण 10 अधिकारी, 01 SRPF प्लाटून व 150 अंमलदार समाविष्ट होते. वाशिम पोलीस दल कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज असून सर्व नागरिकांनी सण-उत्सव शांतपणे साजरे करावे व कायद्याचे पालन करावे, असे आवाहन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.