Welfare Activities
मा. पोलिस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी वाशिम पोलिस दलातील सर्व पात्र अंमलदारांना पदोन्नती दिली.
मा. पोलिस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी वाशिम पोलिस दलातील अंमलदारांना पदोन्नती दिली होती. सदर अंमलदारांचा आज रोजी पदोन्नती सोहळा पार पडला असून या सोहळ्यात एकूण 106 पदोन्नत अंमलदार व त्यांचे कुटुंबीय हजर होते. वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत अंमलदार व त्यांचे नातेवाईक यांनी पदोन्नतीची फित लावली. पदोन्नती सोहळा आयोजित केल्याने अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी मा. पोलिस अधीक्षक यांनी अंमलदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याण शाखेच्या योजनांबाबत व अंमलदारांचे समस्या सोडविण्यासाठी चालू असलेल्या कार्यवाही बाबत माहिती दिली.